ड्रेस मेकिंग

शैक्षणिक पात्रता

प्रशिक्षण कालावधी

व्यवसायाचा प्रकार

मैत्रिणींनो ,  आज आपण मुलींसाठी / महिलासाठी आय,टी.आय. मध्ये असणारा जास्त लोकप्रिय ट्रेडची माहीती पहाणार आहोत. सुईंग टेक्नोलाॅजी याट्रेडचे आधीचे नाव कटींग ऑन्ड सुईंग होय. थोडक्यात शिलाई मशिनवर वेगवेगळे कपडे शिवण्याचे  कौशल्य या ट्रेडमध्ये शिकविले जाते ज्यांना  शिलाई मशीन, ऑपरेटर, डिझाइनरचे सहाय्यक, बुटीकमधील सहाय्यक काम, नमुना कपड्याचे सहाय्यक, डिझाईनर आणि कपड्याचे नमुना समन्वयक म्हणून सहाय्य होण्याची इच्छा आहे अशा उमेदवारांसाठी आहे सुईंग टेक्नोलाॅजी हा ट्रेड चांगला आहे. या ट्रेडमध्ये कसले कसले कौशल्य शिकविले जाते ते पाहु या.

कटींग, शिवणकाम आणि फीनिशिंग या कामासाठी योग्य साधने ओळखणे, सुरक्षिततेसह  वापर करणे,  योग्य फॅब्रिक /कपड्याची  निवड.  फॅब्रिकनुसार योग्य सुईचा  आकार आणि शिवणकामाचा धागा निवडण्याचे यात शिकविले जाते.  फॅब्रिक सरळ करण्याच्या पध्दती.  दोन स्टीच/टाके दरम्यान अंतर राखण्यासाठी,  टाके लांबी आणि रुंदी बद्दल काळजी घेणेबाबत   सजावटीचे  टाके करताना रंग संयोजनाचे अनुसरण करणे, हेमिंग स्टिच वापरुन फॅब्रिकची कडा पूर्ण करणे,  शिवणकाम करताना सुरक्षित उपाय आणि सुई गार्ड पॉलिसीचे अनुसरण करणे याबाबतचे कौशल्य दिले जाते. दिलेल्या फॅब्रिकचा वापर करुन  कटिंग, शिवणकाम फिनिशिंगसाठीची साधने वापरुन  सीम फिनिश, डार्ट, प्लेट, टक्स,आणि शर्ट, फ्रिल्स, हेम्स, एज फिनिशिंग, नेकलाइन, प्लेकेट, पॉकेट, कॉलर, स्लीव्ह, कफ बनविण्याचे शिकविले जाते. लेडीज सूटसाठी  पॅर्टन  तयार करणे, बनवलेल्या  पॅटर्नच्या मदतीने लेडीज सूट शिवणेबाबत शिकविले जाते. लेडीज टॉप / शॉर्ट कुर्थी, लेडीज ,सूट, नाईटवेअर (एक तुकडा / दोन तुकडा), साडी ब्लाउज,नवीन जन्मासाठी कपडे,छोट्या मुलासाठी कपडे ,मुलांसाठी कपडे  रेखाटन करण्याचे कौशल्य शिकविले जाते. रेखाटलेल्या डिझाइननुसार फिटिंग आणि गुणवत्तेसह वरील कपड्यांचे शिलाई काम शिकविले जाते.  साडी पेटीकोट, लेडीज टॉप / शॉर्ट कुर्थीज ,  लेडीज सुट, नाईटवेअर (योकसह एक तुकडा)  नाईटवेअर (टू पीस - नाईट सूट) साडी ब्लाउज (साधा मॉडेल - साधा),  नवजात मुलासाठी ड्रेस (ढाबला)  लहान मुलासाठी ड्रेस (सन सूट)  मुलांसाठी ड्रेस (फ्रॉक)  गेंट्सचा कुर्ता आणि पायजमा  जेंटचा कॅज्युअल शर्ट  जेंट चे ट्राउझर्स या प्रकारचे कपडे शिवण्याचे कौशल्य शिकविले जाते.

ट्रेडशी  संबंधित साधने, त्यांचे महत्त्व, वापर आणि साधने हाताळताना घ्यावयाची सुरक्षिततेचि  खबरदारी,  मापन साधने, ड्राफ्टींग  साधने, मार्किंगची साधने, कटिंगची   साधने ,शिवणकामाची साधने आणि फिनिशिंग टूल्स याबाबत माहिती दिली जाते.  फॅब्रिक्सचे प्रकार,फॅब्रिक्स आणि पोत ओळखणे,फॅब्रिक्स  हाताळण्याची पद्धत , फॅब्रिक प्रकारांनुसार सुई आणि धाग्यांची निवड अशा प्रकारची फॅब्रिक संबंधित मूलभूत माहिती दिली जाते.   फॅब्रिक किनारा, संकोचन, मोजण्याचे तंत्र, सुईगमशीनची माहिती ,विविध प्रकारच्या शिलाई माशिनचे   प्रकार, वेगवेगळे पार्टस आणि त्यांचे कार्य , मशीनची कार्यपद्धती, देखभाल आणि दुरुस्तीबाबतचे,मशीनमध्ये काही अडचण / समस्याआली  तर दूर करण्याचे  कौशल्य याबाबत शिकविले जाते.  तसेच ओव्हरलॉक मशीन त्याचे  वेगवेगळे पार्टस आणि त्यांचे कार्य मशीनची कार्यपद्धती, देखभाल आणि दुरुस्तीबाबतचे,मशीनमध्ये काही अडचण / समस्याआली  तर दूर करण्याचे  कौशल्य याबाबत शिकविले जाते .शिवणाचे वर्गीकरण ,त्याचा वापर,शिवण कामाच्या साहाय्याने सजावट , शिवणकामाची प्रक्रिया. शिवणकाम करतेवेळी तीव्र गती, त्याचे महत्व , शिवणकाम करतानाची खबरदारी , शिवणकामात प्लेट्स ( धड्या ) त्याचे महत्व , प्रकार आणि वापर याबाबत शिकविले जाते. टकस चे प्रकार आणि वापर , झारलचे प्रकार आणि त्यांचे वापर , हात शिलाई , त्यासाठी वापरल्या जाणाऱया सुई आणि त्यांच्या त्यांचे साईज  , शिलाई धाग्याचे प्रकार आणि हात शिलाईचे प्रकार व उपयोग याबाबत शिकविले जाते. कॉर्नर मार्गिन त्याचे प्रकार आणि वापर, केसिंगची ओळख , त्याचे उपयोग.  एज (कडा ) ची फिनिशिंग आणि त्याचे प्रकार. नेकलाईनचे ( गळा ) वेगवेगळे प्रकार. खिच्यांचे प्रकार आणि वेगवेगळे प्रकार .  कॉलरचे वर्गीकरण आणि कॉलर संबंधित माहिती, खांद्याचे वर्गीकरण ,लांबी वरून त्याचे प्रकार , त्रिमिन्गचे प्रकार , उपयोग , बटण साठी होल पाडणे ,बटण /हुक लावणे. लेडीज सूटसाठी रेखाटणे आणि ते विकसित करणे. मानवी शरीरातील सांधे ,स्यायु चे थोडक्यात परिचय. शरीराचे मोजमापाचे  महत्व , मापनाचे महत्त्व, प्रकार आणि मापन तंत्र आणि मोजमाप घेताना घ्यायची खबरदारी. मापनाचा तक्ता याबाबत शिकविले जाते. पॅटर्नचे महत्व , पॅटर्नची माहिती, त्याचे प्रकार ,लेआउटचे प्रकार , दिलेल्या नमुन्यांची नमुने वापरून वेगवेगळ्या प्रकारच्या लेआउटचा तयार करणे ,  मसुदा / पॅटर्न टर्मिनोलॉजी,नमुना मसुदा तत्त्वे याबाबत शिकविले जाते. प्रेसकरण्याची साधने, पद्धती ,प्रेसिंगचे महत्व , ट्रायल रूमची गरज आणि तपशील  .साडी आणि  पेटीकोटचे स्केचिंग आणि मसुदा तयार करण्याबाबत ,शिवणकाम विभागात वापरल्या जाणार्‍या औद्योगिक मशीनचे  मास उत्पादन प्रक्रियेत  वापरण्या  जाणाऱ्या  मशीनची माहिती जसे दुहेरी सुई मशीन, बटण होल मशीन,  बटण शिवणकामाचे यंत्र , बहुउद्देशीय मशीन (झिग झॅग) ,बार टॅक मशीन याविषयी शिकविले जाते. खालील कपड्यांचे डिझाईन , शिवण्यास येणार खर्च , कापडाचा खर्चाचा अंदाज काढण्याबाबतही शिकविले जाते. 

पुढील शिक्षणाचे मार्ग

नोकरीची संधी