फीटर (Fitter)

शैक्षणिक पात्रता

प्रशिक्षण कालावधी

व्यवसायाचा प्रकार

आय.टी.आय. मधील फीटर हा ट्रेड फार लोकप्रिय आहे. मेकॅनिकल , केमिकल क्षेत्रातली अशी कोणतीही कंपनी नाही जेथे फीटर नाही. फीटर शिवाय कोणत्याही कंपनीत काम होऊच शकत नाही. मोठे मोठे उड्डाण पुल , मेट्रो रेल्वेचे बांधणीचे काम सुरु आहे तेथे पण फीटरची आवश्यकता असतेच. फीटर हा ट्रेड ALL ROUNDER ट्रेड आहे या ट्रेडमध्ये फीटर ट्रेड व्यतिरिक्त वेल्डर(WELDER) ट्रेडची कौशल्ये नळकारागिर (PLUMBER) ट्रेडची कौशल्ये कातारी (TURNER) ट्रेडची कौशल्ये पत्रे कारागिर ( Sheet Metal Worker) ची कौशल्ये शिकविली जातात.चला तर अजुन यात काय काय शिकविले जाते ते पाहुया...

शाॅप फ्लोअरवर (काम करायचे ठिकाण) सुरक्षिततेचे महत्त्व आणि सर्वसाधारण खबरदारी,  प्रथमोपचार परिचय ,  स्वत:च्या सुरक्षिततेचे साधने यांचा परिचय  5 एस संकल्पना आणि त्याच्या उपयोग व महत्त्व, आगीची व्याख्या, आगीचा त्रिकोण , आग विझविण्याची साधने, प्रथमोपचार, अपघात याविषयी शिकविले जाते.   मोजमाप  करण्याची साधने,त्याची युनिट्स, डिव्हिडर्स, कॅलिपर, हर्माफ्रोडाइट, सेंटर पंच, डॉट पंच, त्यांचे वर्णन आणि विविध प्रकारचे हातोडी त्यांचा प्रकार आणि उपयोग,  ‘व्ही’ ब्लॉक्स, अँगल प्लेट,  कोनीय मोजमाप करणारी उपकरणे त्यांचे मुख्य भाग जसे  ट्राय स्केअर .प्रोटाॅकटर , काँमिनेशन सेट यांचे वर्णन, वापर आणि काम करताना घेतली जाणारी  काळजी ,  व्हाईस — त्याचे प्रकार, मुख्य भाग , बांधणी , बनावटीचे धातु, उपयोग , काम करताना घ्यावयाची काळजी, आणि देखभाल  याबाबतचे ज्ञान दीले जाते. फाईल ( कानस )- वर्गिकरण, वर्णन, बनावटीचे धातु ,मुख्य भागांची माहीती, ग्रेड आणि कट वरुन फाइल प्रकार आणि त्यांचा वापर आणि वापरताना घ्यावयाची काळजी, विशेष फाईली त्यांचा प्रकार आणि वापर,  हॅक्सॉ फ्रेमचे प्रकार व वापर , ब्लेडचे साहित्य, ब्लेडचे भाग आणि ग्रेड, काम करताना घ्यावयाची काळजी याविषयी शिकविले जाते.   जाॅब मार्किंग/ लेआउट साधनेची साधने जसे डिव्हिडर्स, स्क्रिबिंग ब्लॉक, आॅड लेग कॅलिपर, पंचचे , प्रकार आणि उपयोग  कॅलिपरचे प्रकार,त्यांचा उपयोग, काम करताना घ्यायची काळजी व देखभाल.  सरफेर प्लेट आणि  ‘व्ही’ ब्लॉक, अँगल प्लेट्स, यांचे वर्णन, प्रकार आणि उपयोग , छिनीचे बनावटीचे  साहित्य,त्याचे प्रकार आणि त्यांच्या कटींग एजचे कोन, धातु कापण्यासाठी वापरल्या जाणार्‍या मशिन्स जसे  पॉवर सॉ, बँड सॉ, सर्क्युलर सॉ मशीन यांची माहीती.  व्हर्निअर कॅलिपर , व्हर्निअर हाईट गेज आणि व्हर्निअर बेव्हल प्रोटेक्टर  यांचे कार्य तत्त्व, मुख्य भाग , बनावटीचे धातु, लहानात लहान मोजण्याची क्षमता, माप रिडींगचे कौशल्य ,  आऊट साईड आणि इन साईड  मायक्रोमीटर आणि डेप्थ मायक्रोमीटर त्यांचे मुख्य भाग , बनावटीचे धातु, कार्याचे तत्त्व, लहानात लहान माप मोजण्याची क्षमता , माप रिडींगचे कौशल्य, कार्य करताना घ्यायची काळजी आणि देखभाल याचे ज्ञान दीले जाते. डिजिटल मायक्रोमीटरचे वर्णन आणि उपयोग,  व्हर्निअर मायक्रोमीटर आणि  स्क्रू थ्रेड मायक्रोमीटर यांचे कार्य तत्त्व, मुख्य भागांची माहीती, लहानात लहान माप मोजण्याची क्षमता , माप रिडींगचे कौशल्य , काम करताना घ्यायची काळजी, देखभाल ,वरील सर्व अति सुक्ष्म मापन उपकरणांविषयी शिकविले जाते.

या ट्रेडमध्ये शीट मेटल या ट्रेडविषयीची  प्राथमिक कौशल्ये शिकविली जातात.  शीट मेटलमधील कौशल्य शिकविली जातात.   शीट मेटल कार्यशाळेत घ्यावयाची सुरक्षितता,  शीटचे आकार, व्यावसायिक आकार आणि विविध प्रकारच्या धातूच्या शीट, कोटेड शीट आणि त्यांचा उपयोग ,मार्किंग आणि मोजण्याचे साधने, विंग कंपास, प्रिक पंच, स्निप्स/ कातरी , प्रकार आणि उपयोग.  शीट मेटलमधील  ज्वांईंटचे विविध प्रकार, कामानुसार त्यांची निवड आणि उपयोग,  रिव्हेटींगची पद्धत.  शियरिंग मशीनचे कार्य , वर्णन, मुख्य भाग याविषयी शिकविले जाते.   धातुला ड्रील करण्यासाठी वापरात येणारे   ड्रील बीट त्याचे प्रकार, मुख्य भाग व त्यांचे कार्य आणि आकार (अपूर्णांक, मेट्रिक, संख्या, पत्र ड्रिल)  वेगवेगळ्या मटेरिअलसाठी कटिंग अँगल  ,  ड्रिल होल्डिंग डिव्हाइसेस व  उपयोग,ड्रीलिंगसंबंधीत ऑपरेशन जसे रीमिंग,काउंटर सिंक, काउंटर बोर आणि स्पॉट फेसिंग याबाबतही शिकविले जाते. वेगवेगळ्या ड्रिलिंग मशीन ,त्यांचे मुख्य भाग आणि उपयोगात येणारे कामाचे स्वरुपावरुन वापर याचे ज्ञानही दीले जाते. अभियांत्रिकी धातुचे भौतिक गुणधर्म जसे रंग, वजन, चुंबकीय गुणधर्म, गुरुत्व. तसेच  यांत्रिकी गुणधर्म जसे  कठोरता, ठिसूळपणा, कडकपणा, आणि लवचिकता. कास्ट आर्यनचे प्रकार, गुणधर्म आणि वापर.  लोखंडाचे गुणधर्म आणि वापर.  स्टील: प्रकार, गुणधर्म आणि वापर.   अलोह धातू (तांबे, अल्युमिनियम, कथील, शिसे, जस्त) गुणधर्म आणि वापर.  अल्युमिनियम   उपयोग, फायदे आणि मर्यादा याबाबत शिकविले जाते.  थ्रेडचे प्रकार , टॅपचे   प्रकार जसे हात टॅपआणि मशिन टॅप, वापरण्याची पद्धत.   टॅप ड्रिल साईज सुत्र  टॅप रेंजचे प्रकार आणि त्यांचे उपयोग. जाँबमध्ये तुटलेला टॅप, स्टड काढण्याची पध्दत. डायचे प्रकार आणि उपयोग,  ग्राइंडिंग व्हीलची माहीती, प्रकार आणि   वापर, माउंटिंग आणि ड्रेसिंगचे महत्त्व आणि करण्याची पध्दत याबाबत शिकविले जाते.

पुढील शिक्षणाचे मार्ग

नोकरीची संधी